Monday 5 November 2012

 जीवन 

..............................

सुर  गवसेना 

अशी लागलीसे भूक 

बेताल झाले संगीत 

जीवनाचे ...

सोसाट्याचा वारा 

सारा  पालापाचोळा 

धगधग पेटला 

जीवनाचा ...

भरतांना रंग 

भीजे अश्रूंनी कागद 

चित्र झाले धूसर 

जीवनाचे ...

वीण घालता दोरा 

क्षणांत गुंतला 

गुंता सोडता सुटेना 

जीवनाचा ...

अमृताची आस 

कोजागीरीच्या राती 

ढगाळलेला चंद्र 

जीवनाचा ...

जगता जीवन जीवाचे 

 जगन्नाथाचा आसरा 

जडमूळ तारण्या 

जीवनांत ...

-----------------------

महेशचंद खत्री .